Naseeruddin Shah | मोदी प्रत्येक गोष्टीत धार्मिक पैलूंना सहभागी करतात – नसीरुद्दीन शाह

Naseeruddin Shah | मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचं उद्घाटन केलं. या उद्घाटन सोहळ्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. त्याचबरोबर या संसद भवनावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक गोष्टीत धार्मिक पैलूंना सहभागी करतात, असं विधान नसीरुद्दीन शाह यांनी केलं आहे.

Modi involves religious aspects in everything

नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) म्हणाले, “जुन्या संसद भवनाची इमारत साधारण शंभर वर्षे जुनी आहे. म्हणून नवी इमारत उभारली गेली. मात्र, अशा प्रकारच्या उद्घाटन सोहळ्याची गरज होती का? मोदी प्रत्येक गोष्टीत धार्मिक पैलूंना सहभागी करतात. तुम्ही अशा पद्धतीने पुजाऱ्यांना घेऊन आला होता, जसं की तुम्ही इंग्लंडचे राजे आहात. तुम्ही राजदंड घेऊन आला.”

पुढे बोलताना ते (Naseeruddin Shah) म्हणाले, “भव्यातेच्या भ्रमाची देखील एक सीमा असली पाहिजे, असं मला वाटतं. मोदी सरकारद्वारे नवीन संसद भवनाचं उद्घाटन हे अत्यंत चालाकीनं खेळला गेलेला पत्ता आहे.”

दरम्यान, ‘द केरला स्टोरी ‘ चित्रपटावर प्रतिक्रिया देत ते (Naseeruddin Shah) म्हणाले, “देशामध्ये सुशिक्षित लोकांमध्ये देखील मुस्लिमांचा द्वेष करणे फॅशन झाली आहे. सत्ताधारी पक्षांनं अत्यंत हुशारीने लोकांच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण केला आहे. आपली लोकशाही धर्मनिरपेक्ष असल्याचं आपण सांगतो. पण मग प्रत्येक गोष्टीमध्ये आपण धर्म का आणतो?”.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.