Mustard Oil | हिवाळ्यामध्ये अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे मोहरीचे तेल; जाणून घ्या सविस्तर

Mustard Oil | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन, त्वचेवर पुरळ येणे इत्यादी समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक केमिकल युक्त औषधांचं  सेवन करतात.

या औषधांचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाची मदत घेऊ शकतात.

मोहरीच्या तेलामध्ये आढळणारे गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. या तेलाचे आरोग्याला खालील फायदे मिळतात.

सर्दी-खोकल्यापासून आराम ( Relief from cold and cough-Mustard Oil )

हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला व्हायरल इन्फेक्शनची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी मोहरीचे तेल उपयुक्त ठरू शकते.

यासाठी तुम्हाला मोहरीच्या तेलाने छातीवर मसाज करावी लागेल. मोहरीच्या तेलाने मसाज केल्यानंतर कफपासून आराम मिळतो.

संधिवातापासून आराम ( Relief from arthritis-Mustard Oil )

हिवाळ्यामध्ये थंडीमुळे अनेकांना संधीवाताचा त्रास जाणवायला लागतो. अशात या समस्येवर मोहरीचे तेल एक रामबाण उपाय ठरू शकते.

यासाठी तुम्हाला मोहरीचे तेल कोमट करून मसाज करावी लागेल. मोहरीच्या तेलाने मसाज केल्यानंतर रक्ताभिसरण सुधारते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

त्याचबरोबर यामध्ये आढळणारे गुणधर्म हात आणि पायांवर आलेली सूज कमी करण्यास मदत करतात.

हृदय निरोगी राहते ( The heart remains healthy-Mustard Oil )

मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड, ओमेगा 6 फॅटी अॅसिड, मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स आढळून येते, जे हृदयाची काळजी घेण्यास मदत करते.

यासाठी तुम्ही जेवणामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करू शकतात. नियमित मोहरीच्या तेलाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहू शकते.

टिपः वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.