fbpx

पाचपुते सोडून मी दुसऱ्याची शिफारस करेलच कशी ? – सुजय विखे

टीम महाराष्ट्र देशा : बबनराव पाचपुते सोडून मी विधानसभेसाठी इतर कोणाचीही शिफारस करणार नाही, कारण इतरांनी माझे लोकसभेचे काम तर केलेच नाही उलट विरोधी उमेदवाराचे काम केले असल्याचे खासदार सुजय विखे यांनी ठासून सांगीतले आहे. नागवडे साखर कारखान्यावर गुप्त खलबते झाले होते, त्यावर सुजय विखेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पारगाव येथे आयोजित कार्यक्रमात डॉ.विखे बोलत होते.

दरम्यान, भाजपमध्ये येणारांना आमचा विरोध नाही, परंतु ज्या बबनराव पाचपुते यांनी माझ्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिक प्रचार करून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मला चांगले मताधिक्य मिळवून दिले. त्यांचीच शिफारस मी विधानसभेसाठी करणार आहे. विधानसभा झाल्यावर पाचपुते यांच्या सत्काराच्या निमित्ताने श्रीगोंदे तालुक्यातील प्रत्येक गावात मी येणार आहे. अस देखील विखे म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे प्रा. तुकाराम दरेकर हे श्रीगोंदा तालुक्यात अभ्यासू आहेत. मुख्यमंत्र्यांना सांगून प्रा. दरेकर यांना राज्यपातळीवर एखाद्या अभ्यास मंडळावर काम करण्याची संधी उपलब्ध करून देईन. आण्णासाहेब शेलार हे पाचपुते यांचा केक गोड करून घेतील व शेलारांची जबाबदारी माझ्याकडे राहील, असे ही विखे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या