Mental Health | मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी संगीताचा होऊ शकतो असा वापर

How Music Can Improve Your Mental Health

Mental Health| म्हणतात, परमेश्वराने माणसाला त्याच्या यातनांमधून सुटका मिळावी म्हणून जी त्रिरत्नांची दिक्षा दिली त्यातील एक रत्न, संगीत होतं.

आपल्या मनोरंजनासाठी, बोर्डम मधून सुटका मिळवण्यासाठी, किंवा कधी कधी नुसता वेळ घालवण्यासाठी आपण संगीत ऐकतो. आपल्या आनंदाचा समाधानाचा स्रोत आपल्याला संगीतात सापडू शकतो. काही संशोधनं तर हे सुद्धा सांगतात की संगीताचा माणसाच्या आरोग्याशी संबंध असतो. पण तुम्हाला माहिती आहे का संगीताचे बरेचसे फायदे आपल्या मानसिक स्वास्थ्याशी (Mental Health) सुद्धा जोडलेले आहेत. संगीत आपलं मन शांत करू शकतं, आपल्या क्रोधाला रीचवू शकतं, किंवा आपल्या दुःखातून आपल्याला मोकळं करू शकतं. 

आधुनिकोत्तर जगात माणूस नेटवर्क द्वारे विश्वाशी बांधला गेलेला असला, डिजिटल स्पेस मध्ये तो शेकडो लोकांशी संबंधित असला तरीही त्याचं वैयक्तिक आयुष्य एकाकी होत चाललंय. डोळ्यांसमोरून स्क्रीन सरकली म्हणजे त्याला आपल्या भोवती किती दुःख साचून आहे याची जाणीव होते. आजच्या माणसाला कंटाळा सहन होत नाही. त्यामुळे दुःख (Greif), डिप्रेशन (Depression), PTSD सारखे रोग आजच्या समाजा समोरचे मोठे प्रश्न झाले आहेत.

संगीताचा थेरेपी (Music Therepy) साठी वापर

अलीकडच्या काळात मानसिक रुग्णांना त्यांच्या व्याधीतून सुटका मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा प्रयोग होतो आहे. त्यातच चित्रकला, नाट्य, नृत्य यांसारख्या निरनिराळ्या कलांचा सामावेश होतो. संगीत सुद्धा यापासून अलिप्त नाही. कोणत्या मानसिक रोगाचे निदान करायचे आहे त्यावरून कोणती उपचार पद्धती अवलंबली जाईल हे ठरते. संगीत भावनांना जागृत करू शकते त्यामुळे Depression, Anxiety, Autism, सारख्या रोगांसोबत निद्रानाश, व्यसनाधीनपणा या सुद्धा रोगांची तीव्रता कमी करण्यासाठी पुढील वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात:

  • गायन
  • वादन
  • एखाद्या संगीताची लय धरून नाचणे
  • शांत संगीतासोबत ध्यान करणे

आपण काय ऐकतो त्याचा मनावर फरक कसा पडतो?

बऱ्याचदा तरुणांना आपण खूप उंच स्वरातील हार्ड रॉक, किंवा ‘हेवी’ संगीत ऐकताना आणि त्यावर थिरकताना बघतो. खरंतर त्या गाण्यांमधून वेगळ्या पद्धतीचं catharsis म्हणजे विरेचन त्यांना मिळत असतं. ती गाणी कोणत्या तरी सुप्त भावनांची वाट मोकळी करून देत आहेत हे आपण समजून घ्यायला हवं.

अलीकडे भारतात झालेल्या एका अभ्यासात म्हटलंय, आपल्या अनुभूती, अनुभव, भावना यांना संगीत वाट मोकळी करून देतं. तो अनुभव केवळ श्राव्य अनुभव आल्याने रसग्रहण करणााऱ्यास काय वाटलं पाहिजे या बाबत कोणत्याही सूचना ती कलाकृती देत नाही. त्यामुळे ऐकण्यातून मिळालेला अनुभव खोल आणि अधिक प्रमाणात व्यक्तीसापेक्ष असतो. त्या बाबतीत शास्त्रीय संगीतातील येणारा अनुभव हा आणखीन दर्जेदार समजला जातो.

त्यामुळे मन शांत ठेवायचंय, तर नक्कीच आपली आपली प्लेलिस्ट अपडेट करा. मोकळं मान ठेऊन वेगवेगळ्या प्रकारचं संगीत आपल्या यादीत जोडा!

महत्त्वाच्या बातम्या:

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.