Manoj Jarange | मराठ्यांची शक्ती, दम बघायचया का? हे आरक्षण आम्हाला नको – मनोज जरांगे

हे आरक्षण आमच्यावर थोपवू नका. सरकार देतंय ते आरक्षण आम्हाला नको | Manoj Jarange

Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे.  राज्य सरकारने  मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणार कायदा विधीमंडळात पास करण्यात आलाय.

यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले. ”हे आरक्षण आमच्यावर थोपवू नका. सरकार देतंय ते आरक्षण आम्हाला नको. मराठ्यांची शक्ती, दम बघायचया आहे का? आम्हाला जे पाहिजे आहे ते आम्ही मिळवणारं.

Manoj Jarange Comment On Maratha Reservation Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला म्हणूनच त्यांना 6 महिन्याचा वेळ दिला. प्रत्येक वेळी भावनेच्या आहारी जाऊन आमच्या लेकरांचं वाटोळं होऊ देणार नाही, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. हरकती चा विषय पुढे करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा हे बरोबर नाही.

निवडणूक आहे तो पर्यत टिकेल ,उद्या उडाले की बसा बोंबलत. आम्हाला त्या लफडयात पडायचं नाही. सग्या सोयऱ्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणीतरी काम करू देत नाहीये.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.