IPL 2024 | ‘या’ मैदानात खेळवला जाणार IPL चा अंतिम सामना

IPL 2024 final match played this stadium

IPL 2024 च्या १७ व्या हंगामाची सुरुवात २२ मार्चपासून झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ७ एप्रिल पर्यंत एकूण २१ सामने पार पडणार आहेत.

दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक हे निवडणुकांच्या तारखांनुसार तयार करावे लागणार आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर होईल त्याआधी IPL 2024 चा अंतिम सामना कोठे खेळवला जाणार आहे याची माहिती समोर आली आहे.

पीटीआयच्या अहवालात असे म्हटले आहे की IPL 2024 चा अंतिम सामना २६ मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. तर दुसरी क्वालिफायर ही चेन्नईत होणार आहे. तसेच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर आणि एलिमिनेटरच्या सामान्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने गेल्या वर्षीच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जच्या घरच्या मैदानावर सुरुवातीचे सामने आणि अंतिम सामने आयोजित करण्याची परंपरा राखली आहे.

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील ३ सामने खेळले गेले आहेत. त्यानंतर गुणतलिकेत सध्या CSK २ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर पंजाब दुसऱ्या आणि KKR तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.