Ajit Pawar यांना भाजपचा मोठा धक्का; बारामतीची जागा राष्ट्रवादीला नाही

Harshvardhan Patil reaction on Baramati Lok Sabha Election

Ajit Pawar । पुणे । निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिले आहे. यावर अजित पवार समर्थक जल्लोष करत आहेत. दुसरीकडे शरद पवार गटात धाकधूक वाढली आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर आता लवकरच पक्ष कार्यालयेही शरद पवार गटाच्या ताब्यातून अजित पवार गट घेणार असल्याचे समोर येत आहे.

अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘राष्ट्रवादी पक्ष कार्यालये ताब्यात घेण्याबाबत अजून आदेश नाहीत. वरिष्ठ पातळीवरून आदेश आले की, लगेच पक्ष कार्यालये ताब्यात घेऊ. सध्या पक्ष चिन्ह आम्हाला मिळालं, त्यामुळं पक्ष कार्यालयं आमच्या बाजूला येईल.’

Harshvardhan Patil reaction on Baramati Lok Sabha Election

दरम्यान, अजित पवार यांच्यासाठी आनंदाचे क्षण असताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil ) त्यात मिठाचा खडा टाकला आहे. बारामती लोकसभेच्या जागेवरून पाटलांनी सूचक व्यक्तव्य करत अजित पवारांना डिवचले आहे.

बारामतीच्या लोकसभेवर बोलताना पाटील म्हणाले की, बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार घड्याळाचा चिन्हावर उतरेल, हे महायुतीत अद्याप ठरलं नाही, तसेच इंदापूर विधानसभेची कोणी चिंता करू नये, असं विधान हर्षवर्धन पाटलांनी केले आहे.

बारामती मतदारसंघातून हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे निवडणूक लढण्यास सज्ज आहे, तशी त्यांनी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार ( Ajit Pawar ) गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी पराभव केला होता. भरणे हे अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे इंदापूरच्या विधानसभेच्या जागेवरूनही भाजप आणि अजित पवार गटामध्ये वाद निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे.

Ajit Pawar claims Baramati Lok Sabha seat

बारामतीत सध्या शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या रिंगणात असणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.