PM Kisan Yojana | ठरलं तर मग! 15 तारखेला मिळणार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतील 15 वा हप्ता

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे.

या योजनेचे 14 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले आहे. यानंतर शेतकरी आता या योजनेतील पंधराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.

अशात या योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पीएम किसान योजनेतील पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी जारी करण्यात येणार आहे.

This installment will be sent to the bank account of farmers on 15 November

पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची शेतकरी वाट बघत आहे. अशात 15 नोव्हेंबर 2023 रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे 15 वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीत उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांना 15 वा हप्ता मिळेल.

प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेतील (PM Kisan Yojana) पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी आधार कार्ड लिंक आणि जमिनीची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी या सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहे. त्यांना या योजनेतील पंधरावा हप्ता मिळेल.

दरम्यान, देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे.

या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जातात.

आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. अशात तुम्ही अजून पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in/) जाऊन तुम्ही यासाठी नोंदणी करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.