fbpx

पंकजा मुंडे आठशे कोटी रुपयांंच्या दारु कारखान्याच्या मालकीण : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येवून ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येवू लागला आहे.याच पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकावर टीका करत आहेत. यातच विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. ते म्हणाले की, आमच्या बहिणाबाईकडे काहीही कमी नाही. त्यांच्याकडे औरंगाबादला दारुचा कारखाना आहे. हा दारुचा कारखाना साधा सुध्दा नाही आठशे कोटींचा आहे. मग काय कमी आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. परळी विधानसभा मतदार संघातील बंजारा समाज बांधवांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना धनंजय मुंडे बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा येतात आणि येऊन बचत गटाच्या महिलांना नादी लावतात. तर दुष्काळात गायी वाटल्या जातात. दुष्काळात खायला चारा नाही आणि गायी वाटप सुरु आहे. मायबाप शेतकऱ्याला आहे ती जनावरं संभाळनं होतं नाही. त्यामुळे गायीन ऐवजी आगोदर चारा द्या, असे धनंजय मुंडें म्हणाले.

तसेच पंकजा मुंडेंना शेतकऱ्यांचे जीवन कळलंच नाही त्या फक्त निवडणुकीपुरतंच इथं येतात. समाज सेवा कशी करायची ते गोपीनाथ मुंडें साहेबांनी आणि स्व. पंडित अण्णांनी मला शिकवलं कारण मी त्यांच्यासोबत सावली सारखा होतो आमच्या बहीण बाईं नाही. तीच परंपरांना चालवायची म्हणून आशीर्वाद द्या. सत्तेत असून एकही उद्योग नाही आणला तसेच पावनभूमी क्रांतीस्थळ परळी येथील बारा ज्योतिर्लिंग वैद्यनाथ देवस्थानचा ज्योतिर्लिगचा दर्जा केंद्र सरकारने काढून टाकला. त्यावेळी आमच्या खासदार ताई कुठे होत्या. देव पळवून नेला तरी आमच्या बहीणबाई झोपलेल्या होत्या असा टोला धनंजय मुंडें यांनी लगावला.

दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघात यंदा भावा बहिणीत चुरस पाहिला मिळणार आहे. कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे महाराष्ट्रातील २ बडे नेते विधानसभा निवडणुकीला आमने सामने असणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी परळी मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर मतदारांना आपल्या बाजूने करून घेण्याचा जोरदार प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून होत आहे.