छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत लाथा-बुक्क्यांनी हाणामारी

राजकीय पक्षाकडून इच्छुक उमेदवार असलेल्या समर्थकांकडून मराठा आंदोलकास मारहाण

छत्रपती संभाजीनगर, राजेभाऊ मोगल : मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या मारहाणीत मराठा आंदोलक विकास भोकरे उर्फ विकिराजे पाटील यास गंभीर दुखापत झाली असून त्यास तातडीने जालना रोडवरील वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल मराठा समाजाच्या वतीने संताप व्यक्त केला जात आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर येथील जळगाव रोड वरील मराठा मंदिर या ठिकाणी उमेदवार जाहीर करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता बैठक झाली.

या बैठकीत उमेदवारांची नावे सुचवा, असे आवाहन केल्यानंतर काही नावे समोर आली. त्यावर दुसऱ्या गटांनी आक्षेप घेत तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडून पैसे घेतलेत आणि उमेदवार बनले आहेत, असा आरोप केला.

त्यावरून टीका टिपणी सुरू असतानाच तेथील उपस्थित काही समन्वयक विकास भोकरे उर्फ विकीराजे पाटील यांच्या अंगावर धावले आणि त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाण सुरू असतानाच झुंजार छावा संघटनेचे नेते सुनील कोटकर यांनी धाव घेत भोकरे यांचा जीव वाचवला अन्यथा अनुचित प्रकार घडला असता.

ही मारहाण करणारी मंडळी एका मोठ्या पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांचे समर्थक होते, असा आरोप मराठा आंदोलकांकडून केला जात आहे. यावेळी बाळू औताडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे युवा नेते सचिन मिसाळ, छावा संघटनेचे अशोक मोरे यांच्यासह रवींद्र बनसोड, अंकत चव्हाण, किशोर चव्हाण, सुनील कोटकर, अक्षय शिंदे, विजय काकडे, अशोक वाघ, गणेश उगले, राजेश मेटे, सुवर्णा मोहिते, मनीषा मराठे, रेखा वाहटूळे, कल्पना मिलिंद पाटील, सतीश जगताप, सचिन हावळे, लक्ष्मण नवले, रमेश पाटील पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.