Pune Crime | पुण्यात कोयता गँगनंतर रुमाल गँगची दहशत! वनशिव झोपडपट्टी परिसरात फोडल्या गाड्या

Pune Crime | पुणे: पुण्यातील वारजे परिसरात काल (19 जून) कोयता गँगकडून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अशात पुन्हा एकदा आज पुण्यात गाड्यांची तोडफोड झाल्याचं दिसून आलं आहे. आज पहाटे तळजाई परिसरातील वनशिव झोपडपट्टीमध्ये गाड्या फोडण्यात आल्या आहेत.

30 cars vandalized in Vanshiv slum area

आज (20 जून) तळजाई परिसरातील वनशिव झोपडपट्टी परिसरात तब्बल 30 गाड्या फोडल्या (Pune Crime) आहे. 06 जणांनी तोंडाला रुमाल बांधून ही वाहन फोडली आहे. त्यामुळे या गाड्या रुमाल गँगनं फोडल्या असल्याचं बोललं जात आहे. या वाहनांमध्ये ऑटो रिक्षा, टेम्पो, कार इत्यादी वाहनांचा समावेश आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी हा धक्कादायक प्रकार (Pune Crime) घडल्याचं दिसून आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, काल वारजे परिसरात कोयता गँगची (Koyta Gang) दहशत दिसून आली. वारजे परिसरातील कॅनल रोडवर या गँगने  काही गाड्यांच्या काचा फोडल्या (Pune Crime) आहे. वारजे येथील रामनगर कॅनल रोडवर नागेश्वर मंदिराजवळ सोमवारी (19 जुन) सकाळी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.