मनोज जरांगेंवर टीका केली नाही, केली तर शब्द मागे घेत नाही, मी गोपनाथ मुंडेंची औलाद – पंकजा मुंडे

Beed Lok Sabha Election Manoj Jarange VS Pankaja Munde

Manoj Jarange VS Pankaja Munde । बीड लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात आता राजकीय वातावरण चांगलंच पेटले आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विरुद्ध भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) अशी लढत होणार आहे.

बीडमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) विरुद्ध पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) भाष्य केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे.

मुंडे म्हणाल्या की, उपोषण करून कुणाला आरक्षण मिळत नसतं. त्यासाठी विधानसभा, संसदेत कायदा करावा लागतो. त्यासाठी निवडून आलेल्या लोकांना आरक्षणाचा प्रश्न सोडवता येतो. उपोषण केल्याने त्याचा काही फायदा होत नाही.

यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मला माहिती नाही. पण मी त्यांच्या वाट्याला गेलो नाही, त्यांनीही माझ्या वाट्याला जाऊ नये.

पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणासंबंधी (Maratha Reservation) वक्तव्य केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्या नंतर आपण मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली नसल्याचे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिल आहे.

भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे म्हणाल्या की,  ”मी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली नाही, आणि जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

जरांगेंवर टीका केली नाही – पंकजा मुंडे

वर्षभरात मी मनोज जरांगे पाटलाचं नाव देखील घेतलं नाही. मला ज्याच्यावर बोलायचं आहे मी त्याच्यावर मोठ्या आवाजात बोलते आणि मी जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे. गरिबांसाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलावर मी टीका केली नाही.

Beed Lok Sabha Election Manoj Jarange VS Pankaja Munde

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.